ज्यु. अमिताभ आज बालकांच्या भेटीला
By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-28T23:45:57+5:302014-07-29T01:13:01+5:30
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांच्या भेटीला ज्युनिअर अमिताभ बच्चन २९ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता हिंगोलीतील केमिस्ट भवन येथे येणार आहेत.
ज्यु. अमिताभ आज बालकांच्या भेटीला
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांच्या भेटीला ज्युनिअर अमिताभ बच्चन २९ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता हिंगोलीतील केमिस्ट भवन येथे येणार आहेत. बालविकासच्या पहिल्या वर्षीच्या यशानंतर यंदा दुसऱ्या वर्षात पदार्पणनिमित्तच्या या कार्यक्रमात ज्यु. बच्चन बालकांशी संवाद साधणार आहेत.
हिंगोली शहरातील बालमंचला एक वर्ष पूर्ण झाले. गत वर्षभरात बालकांसाठी संस्कारक्षम कार्यक्रमांतून बालमंचने छाप सोडली. शालेय, मनोरंजन, संस्कारक्षम उपक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, कला, संस्कृती, मनोरंजन, आरोग्य, ज्ञान-विज्ञान, क्रीडा आदी महितीपर कार्यक्रम बालकांसाठी घेतले. यंदाही त्यानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. आता दुसऱ्या वर्षात पदार्पणानिमित्त मंगळवारी बालकांच्या भेटीला ज्यु. अमिताभ बच्चन येणार आहेत. शालेय माहितीपासून ते मनोरंजनापर्यंत विविध विषयांवर ज्यु. बच्चन बालकांशी गप्पा मारतील. शहरातील बाल मंचच्या सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
हिंगोली शहरात आज ‘सखी महोत्सव’
श्रावण महिन्यानिमित्त हिंगोली शहरातील ‘लोकमत’ सखीमंच सदस्यांसाठी मंगळवारी ‘सखी महोत्सव’ आयोजित केला आहे. सकाळी साडेअकरा वाजता केमिस्ट भवन येथे हा कार्यक्रम होईल. महोत्सवात ब्रायडल मेकअप, मेहंदी स्पर्धा, पाककृती, फॅन्सी ड्रेस आदी स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेपूर्वी पंधरा मिनिटांअगोदर सहभागी सखींना कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे लागणार आहे. प्रत्येक सखींनी ओळखपत्र सोबत आणून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. मेघा सारिज, परिलेडिज कलेक्शन, गणेश गिफ्ट अॅन्ड नॉव्हेल्टीज यांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.