मंदिरात चोरी करणारा जेरबंद
By Admin | Updated: June 23, 2016 01:11 IST2016-06-23T00:38:18+5:302016-06-23T01:11:36+5:30
कळंब : शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरणाऱ्यास युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

मंदिरात चोरी करणारा जेरबंद
कळंब : शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरणाऱ्यास युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चोरीची घटना मंगळवारी घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सीसीटीव्ही फुटेजवरून बुधवारी या चोरट्याचा तपास लावला.
शहरातील सावरगाव पुनर्वसन भागातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरीस गेल्याची घटना २१ जून रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती. त्यामुळे घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या चोरट्याचा शोध घेतला.
परिसरातील युवक शकील काझी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रिंगरोड भागातून या चोरट्याला पकडून मंदिरात आणले. यावेळी त्याने आपण चोरी केल्याची कबुली दिली. या चोरट्यास नागरिकांनी नंतर पोलिसांच्या स्वाधिन केले.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून इतर काही चोरीच्या घटना उघडकीस येतात का, या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील नेवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)