जीवनदायिनीचे पात्र कोरडेठाक

By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:43+5:302015-12-14T23:53:04+5:30

तळणी: मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून वाहणारी अत्यंत महत्वाची व मोठी असणारी जीवनदायिनी पूर्णा नदी डिसेंबर महिन्यातच कोरडीठाक पडली आहे

Jeevan Daini's eligible dryhead | जीवनदायिनीचे पात्र कोरडेठाक

जीवनदायिनीचे पात्र कोरडेठाक


तळणी: मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून वाहणारी अत्यंत महत्वाची व मोठी असणारी जीवनदायिनी पूर्णा नदी डिसेंबर महिन्यातच कोरडीठाक पडली आहे. त्यामुळे काठावरील गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला समोरे जावे लगण्याची चिन्हे आहेत.
देवठाणा, उस्वद, कानडी, हनवतखेडा, लिंबखेडा, पूर्णा पाटी (तळणी), सासखेडा, इंचा, दुधा, टाकळखोपा, वाघाळा, कि र्ला, भुवन व वझर सरक टे या गावांना सुजलाम सुफलाम करणारी ही मुख्यनदी यंदा डिसेंबरच्या सुरूवातीलाच कोरडी पडल्याने ‘पूर्णा उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था या गावांत निर्माण झाली आहे. पाणीटंचाईचे संकटही गहिरे झाले आहे. महसूल विभागाने वाळू माफियांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Jeevan Daini's eligible dryhead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.