जीप उलटून ७ गंभीर

By Admin | Updated: August 10, 2014 01:30 IST2014-08-10T00:18:02+5:302014-08-10T01:30:36+5:30

शिरडशहापूर : वसमतहून औंढ्याकडे जाताना जीपच्या चालकाने अचानक रस्त्यात आलेला खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता छोट्या पुलाला धडकुन वाहन जागीच उलटले.

Jeep reversed 7 serious | जीप उलटून ७ गंभीर

जीप उलटून ७ गंभीर

शिरडशहापूर : वसमतहून औंढ्याकडे जाताना जीपच्या चालकाने अचानक रस्त्यात आलेला खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता छोट्या पुलाला धडकुन वाहन जागीच उलटले. शिरडशहापूर शिवारात ९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात सातजण गंभीररित्या जखमी झाले.
वसमत येथून प्रवासी घेवून निघालेली खाजगी जीप (क्र.एम.एच.३७ ए.५१५) औंढ्याकडे जाताना शिरडपासून काही अंतर पुढे जाताच भवानीच्या माळाजवळ हा अपघात झाला. त्यात गुलाबराव खंडेराव मोरे (६६, रा. सावंगी), ज्ञानेश्वर वामनराव वाघमारे (३५, रा.सावंगी), नारायण पांडुरंग साळवे (३५, रा. विरेगाव ता. वसमत), महानंदा पांडुरंग यंबडवार (३०, रा. नांदेड), प्रेमीला बबनराव मोरे (३५, रा. वसरणी, नांदेड), विजया विश्वनाथ जोशी (५५, रा. वसरणी, नांदेड), जिजाबाई देवराव मिरेवार (६५, रा. नांदेड) यांना गंभीर दुखापत झाली. माहिती मिळताच कुरूंदा ठाण्याचे जमादार गणेश मस्के, पोकॉ परसराम राठोड यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनाठकर, डॉ. शारेक, एन.एन. काळे यांनी प्रथमोपचार करून जखमींपैकी नारायण साळवे, महानंदा यंबडवार, प्रेमीला मोरे, विजया जोशी, जिजाबाई मिरेवार यांना पुढील उपचाराकरीता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले. दरम्यान जीप चालक फरार झाला. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (वार्ताहर)

Web Title: Jeep reversed 7 serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.