जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: August 6, 2014 02:36 IST2014-08-06T02:21:27+5:302014-08-06T02:36:23+5:30

आळंद : सिल्लोडकडून येणाऱ्या काळी-पिवळी मोटारीने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाले.

Jeep killed in two wheelers | जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


आळंद : सिल्लोडकडून येणाऱ्या काळी-पिवळी मोटारीने धडक दिल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाले. जखमीत काळी-पिवळीमधील प्रवाशांचा समावेश आहे.
येथून जवळच असलेल्या खेडी भायगाव फाटा येथे ही दुर्घटना घडली. काळी-पिवळी जीपने (क्र. एमएच-२०, एए-६५३६) दुचाकीला (एमएच-२० एपी-३६) ला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार किशोर हरिभाऊ नवगिरे, रा. तलवाडा हा जागीच ठार
झाला.
या अपघातात काळी-पिवळीमधील प्रवासी लताबाई शेषराव हिंगमिरे, कमलाबाई दादा धुमाळ, लक्ष्मीबाई बाबूराव धुमाळ, शेषराव हिंगमिरे (सर्व रा. सताळा, ता. फुलंब्री) हे जखमी झाले. या काळ्या-पिवळीने कारलाही (क्र.एमएच-२० बीआर-५६६४) खरचटले.

Web Title: Jeep killed in two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.