जीपच्या धडकेत विद्यार्थी ठार

By Admin | Updated: March 17, 2016 00:16 IST2016-03-17T00:14:09+5:302016-03-17T00:16:07+5:30

पाथरी : अवैध वाहतूक करणाऱ्या जीपची धडक बसल्याने सायकलवरून घरी जाणारा विद्यार्थी जागीच ठार झाला़ ही घटना पाथरी-सोनपेठ रस्त्यावर १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली़

Jeep killed students | जीपच्या धडकेत विद्यार्थी ठार

जीपच्या धडकेत विद्यार्थी ठार

पाथरी : अवैध वाहतूक करणाऱ्या जीपची धडक बसल्याने सायकलवरून घरी जाणारा विद्यार्थी जागीच ठार झाला़ ही घटना पाथरी-सोनपेठ रस्त्यावर १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली़
अविनाश रघुनाथ वानखेडे (१३, रा़ तारुगव्हाण ) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून, तो कानसूर फाट्यावरील चक्रधर स्वामी विद्यालयात शिक्षण घेत होता़ बुधवारी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना एमएच २६ टी- ००८३ या क्रमांकाच्या जीपने अविनाश वानखेडे याच्या सायकलला जोराची धडक दिली़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ आरोपी चालक प्रकाश सूर्यकार (रा़ सोनपेठ) याच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला असून, त्यास अटक केली आहे़ जी़एस़ लेंगुळे तपास करीत आहेत़

Web Title: Jeep killed students