जीप नदीत कोसळली
By Admin | Updated: July 22, 2016 00:35 IST2016-07-22T00:25:02+5:302016-07-22T00:35:46+5:30
उमरगा : शहरालगत असलेल्या हुतात्मा स्मारकाशेजारी उमरगा नदीच्या पुलावरुन जाणाऱ्या जीपला समोरुन येणाऱ्या ट्रकने धक्का दिल्याने जीप नदीत कोसळून चालक गंभीर जखमी झाला

जीप नदीत कोसळली
उमरगा : शहरालगत असलेल्या हुतात्मा स्मारकाशेजारी उमरगा नदीच्या पुलावरुन जाणाऱ्या जीपला समोरुन येणाऱ्या ट्रकने धक्का दिल्याने जीप नदीत कोसळून चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री जीप (क्र.एम.एच२४/ वाय.४९९३) ही जकेकूरहून उमरग्याच्या दिशेने येत होती. यावेळी उमरगा नदीच्या पुलावर जीप समोरुन येणाऱ्या ट्रक (क्र. टी.एस.१२/ यू. ए. ०६४७) ने जीपला धक्का दिला. यामुळे जीप नदीत कोसळून चालक बालाजी नामदेव जमादार (वय ३६ वर्ष, रा. कोरेगाव) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)