जीप पुलावरून कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 00:36 IST2016-07-08T00:19:24+5:302016-07-08T00:36:16+5:30
पाथरूड : भूम - खर्डा मार्गावरील अंतरवली फाट्यानजीकच्या पुलावरून जीप खाली कोसळून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले़ हा अपघात गुरूवारी सकाळी घडला असून

जीप पुलावरून कोसळली
पाथरूड : भूम - खर्डा मार्गावरील अंतरवली फाट्यानजीकच्या पुलावरून जीप खाली कोसळून झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले़ हा अपघात गुरूवारी सकाळी घडला असून, या अपघाताची अंबी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील एक जीप (क्ऱएम़पी़०९- सीडी ९९८०) गुरूवारी सकाळी जळगाव येथून तीर्थक्षेत्र तुळजापूरकडे जात होती़ ही जीप भूम- खर्डा मार्गावरील अंतरगाव फाट्याजवळील पुलावर आली असता चालकाचा ताबा सुटल्याने अचानक खाली नदीपात्रात कोसळली़
जीप खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात जीपमधील तिघे जखमी झाले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंबी पोलीस आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी नेले़ याबाबत अंबी ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, अपघातातील जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नव्हती़