जेसीबीने फोडली ४०० मि.मी.ची जलवाहिनी
By Admin | Updated: December 9, 2014 01:02 IST2014-12-09T00:52:37+5:302014-12-09T01:02:02+5:30
औरंगाबाद : पवननगर, एन-९ येथील ४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात जेसीबी चालकाने फोडली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले

जेसीबीने फोडली ४०० मि.मी.ची जलवाहिनी
औरंगाबाद : पवननगर, एन-९ येथील ४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात जेसीबी चालकाने फोडली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. ९ डिसेंबर रोजी सिडको-हडकोतील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, असे कंपनीने कळविले आहे.
औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम करीत होते; मात्र तोपर्यंत अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागला.
दिल्लीगेट परिसर, एन-९ हडको, पवननगर, एन-११ या भागांना पाणीपुरवठा झाला नाही, तर अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.
जलवाहिनीच्या वर महावितरणचा विद्युत खांब होता. जेसीबी चालकाच्या हलगर्जीपणामुळे तो खांब पडला, तसेच जलवाहिनी फुटली. नागरिक जमा होताच, जेसीबी चालकाने तेथून पळ काढला. या प्रकरणी कंपनीने अज्ञात जेसीबी चालकाविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे.