जावयाने सासुरवाडीतच केली ‘हाथ की सफाई’

By Admin | Updated: July 13, 2016 00:39 IST2016-07-13T00:21:06+5:302016-07-13T00:39:55+5:30

औरंगाबाद : मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावयाने चक्क जाता जाता उस्मानपुरा, फुलेनगरात सासुरवाडीतच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.

Jaya's 'hand cleaning' in Sasurwadi | जावयाने सासुरवाडीतच केली ‘हाथ की सफाई’

जावयाने सासुरवाडीतच केली ‘हाथ की सफाई’


औरंगाबाद : मुलाला भेटण्यासाठी आलेल्या जावयाने चक्क जाता जाता उस्मानपुरा, फुलेनगरात सासुरवाडीतच चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही चोरी करणारा अनिल तुकाराम त्रिभुवन (३५, रा. सिडको एन-३) या जावयाला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले.
कारवाईबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फुलेनगरातील फिर्यादी द्वारकाबाई जगताप या धुणीभांडी करतात. त्यांचे पती टेलरिंगचे काम करतात. त्यांना दोन मुली असून दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. लहान मुलीचा मुलगा द्वारकाबाईकडेच शिक्षणासाठी
राहतो.
दोन महिन्यांपूर्वी नित्याप्रमाणे द्वारकाबाई सकाळी ९ वाजेच्या सुमारास कामावर गेल्या. त्यांचे पती इंदिरानगरात टेलरिंग कामासाठी दुकानावर गेले.
घरी मुलीचा लहान मुलगा प्रमोद (१२) हा एकटाच होता. प्रमोदचे वडील अनिल त्रिभुवन हे एन-३ मध्ये वॉचमन म्हणून काम करतात आणि त्याच बंगल्यात एका खोलीत राहतात. त्या दिवशी प्रमोदला भेटण्यासाठी अनिल आले व गप्पा मारल्या. त्याचवेळी त्यांची नजर सासरवाडीतील कपाटावर पडली. घरी कुणी नाही ही संधी साधून त्यांनी गुपचूप कपाट उघडले. त्यात असलेले चांदीचे कडे, सोन्याची नथ चोरी केली आणि निघून गेले.
या प्रकरणी काल द्वारकाबाईने फिर्याद दिल्यानंतर उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फौजदार कल्याण शेळके, जमादार नितीन साबळे, संतोष त्रिभुवन, प्रल्हाद ठोंबरे, जनार्दन हरणे यांनी शोध घेऊन अनिल त्रिभुवनला अटक केली. ‘खाक्या’ दाखविताच सासूच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेले चांदीचे कडे आणि सोन्याची नथही काढून पोलिसांना दिली.

Web Title: Jaya's 'hand cleaning' in Sasurwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.