शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:31 IST

जायकवाडी धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) : जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) 91.47 टक्के क्षमतेने भरल्यामुळे गुरुवारी दुपारी धरणाचे 18 दरवाजे ०.5 फुट उचलून 9 हजार 432 क्युसेक (267.08 क्युमेक) पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि उर्ध्व धरणांतून होणाऱ्या जोरदार आवकेच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने विसर्ग करण्याचा निर्णय घेतला.

धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फूटाने उघडण्यात आले आहेत. पाण्याची सतत वाढती आवक लक्षात घेता, पुढील काही तासांत विसर्गाचे प्रमाण वाढवला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

दरम्यान, 1 जून रोजी जायकवाडी धरणात केवळ 29 टक्के साठा होता. मात्र, गेल्या आठवडाभरात पावसाचा जोर वाढल्याने साठा झपाट्याने वाढून आज 91.47 टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून आतापर्यंत 50.45 टीएमसी पाण्याची आवक जायकवाडीत झाली आहे. तसेच धरणात सध्या 15 हजार 587 क्युसेक (441.36 क्युमेक) पाण्याची आवक सुरू आहे. यावर्षी लवकरच विसर्ग सुरू झाल्याने कृषी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळणार आहे. 2019-20 नंतर गेल्या 5 वर्षांतील हा चौथा धरणभराव ठरला असून, यंदा पाणीसाठ्याच्या बाबतीत समाधानकारक स्थिती दिसून येते असल्याने शेतकरी चिंतामुक्त आहेत.

एकूण 10 हजार 532 क्युसेक विसर्ग सुरुयंदा छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये पावसाची तुटवडा असल्याने डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र नंतर पावसात वाढ झाल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. मात्र, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 1100 क्युसेक ( 31.15 क्युमेक) पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरु आहे. 18 दरवाजे ०.5 फुट उचलून 9 हजार 432 क्युसेक विसर्ग आणि उजव्या कालव्यातून 1100 क्युसेक असा एकूण 10 हजार 532 क्युसेक विसर्ग सुरु आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र