आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 07:55 PM2021-09-16T19:55:24+5:302021-09-16T19:59:41+5:30

Jayakwadi dam शुक्रवारी आवक आणखी मोठ्या प्रमाणावर घटणार

Jayakwadi dam at 70% even after inflow | आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले

आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले

googlenewsNext
ठळक मुद्देधरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सहा फूट रिकामे आहे.

पैठण : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी ( Jayakwadi dam ) होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटविण्यात आल्याने धरणात येणारी आवक  कमी झाली आहे. गुरुवारी नाथसागरात १८१०३ क्युसेस अशी आवक सुरू असून सायंकाळी जलसाठा ७० % झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी आवक आणखी मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास बंद करण्यात आले ओझर वेअर मधून केवळ ४५७ क्युसेस असा नाममात्र विसर्ग प्रवरेत सुरू होता. यामुळे प्रवरेतून जायकवाडी धरणात नाममात्र आवक दाखल होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आले असून नांदुरमधमेश्वर वेअर मधून जायकवाडी साठी गोदावरी पात्रात केवळ १६१४ क्युसेस असा नाममात्र विसर्ग ठेवण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणात येणारा येवा कमी होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी
१५१५.९३ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सहा फूट रिकामे आहे. धरणात एकूण जलसाठा २२४४.६६ दलघमी ( ७९.२६ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १५०६.६६ दलघमी ( ५३.२० टिएमसी) ईतका झाला आहे.

हेही वाचा - 
- हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला
- थरारक ! कौटुंबिक वादातून महिलेस विष पाजले; त्याच अवस्थेत तिने पोलीस आयुक्तालय गाठले

Web Title: Jayakwadi dam at 70% even after inflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.