जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून पुन्हा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:05 IST2021-06-25T04:05:37+5:302021-06-25T04:05:37+5:30

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे तात्पुरती रद्द केलेली जनशताब्दी एक्स्प्रेस २५ जूनपासून पुन्हा एकदा धावणार आहे. ही रेल्वे शुक्रवारपासून मुंबईहून, ...

Janshatabdi Express will run again from today | जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून पुन्हा धावणार

जनशताब्दी एक्स्प्रेस आजपासून पुन्हा धावणार

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावामुळे तात्पुरती रद्द केलेली जनशताब्दी एक्स्प्रेस २५ जूनपासून पुन्हा एकदा धावणार आहे. ही रेल्वे शुक्रवारपासून मुंबईहून, तर जालन्याहून २६ जूनपासून सुटणार आहे.

जनशताब्दी विशेष एक्स्प्रेसची वेळ आणि थांबे पूर्वीप्रमाणेच असतील. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. ही रेल्वे जालन्याहून सकाळी ८.३० वाजता सुटेल. औरंगाबादला सकाळी ९.१५ वाजता दाखल होईल आणि ९.२० वाजता रवाना होईल. दुपारी ४.२० वाजता रेल्वे मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. रेल्वेत प्रवास करताना केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दिलेल्या कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जनशताब्दी एक्स्प्रेस पुन्हा सुरू झाल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध होणार आहे.

Web Title: Janshatabdi Express will run again from today