बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली
By Admin | Updated: June 15, 2017 23:41 IST2017-06-15T23:38:43+5:302017-06-15T23:41:37+5:30
नांदेड: जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी जनजागृती रॅली काढण्यात आली़

बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सोमवारी जनजागृती रॅली काढण्यात आली़ सदर रॅली उपजिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प सचिव अनुराधा ढालकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली़
जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाअंतर्गत ९ विशेष प्रशिक्षण केंद्र चालविले जातात़ त्यामध्ये एकूण ४३३ बालकामगारांना शिक्षण दिले जाते़ नांदेड शहराअंतर्गत एकूण ६ विशेष प्रशिक्षण केंद्र असून त्यामध्ये ३०० बालकामगारांना शिक्षण दिले जाते़ या विद्यार्थ्यांपैकी १२० जणांनी रॅलीत सहभाग नोंदविला़
यावेळी नायब तहसीलदार तथा प्रभारी प्रकल्प संचालक डी़ एऩ पोटे, सहाय्यक कामगार आयुक्त मोरूडे, कामगार अधिकारी अविनाश पेरके, कार्यक्र्रम व्यवस्थापक रूक्मिणी पवळे उपस्थित होते़ रॅलीचा समारोप बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाला़
दरम्यान, बालकामगारांना शिक्षण देण्याऱ्या आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या विविध संस्था आणि केंद्रामध्ये बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला़ जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते़