शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

‘जलयुक्त उदगीर’ला मिळाला जनाधार

By admin | Updated: May 5, 2016 00:26 IST

उदगीर : पालिकेच्या मालकीचे राज्यातील एकमेव बनशेळकी तलाव़़़ देवर्जन अन् भोपणी प्रकल्पातूनही उदगीरसाठी पाण्याच्या योजना़़़

उदगीर : पालिकेच्या मालकीचे राज्यातील एकमेव बनशेळकी तलाव़़़ देवर्जन अन् भोपणी प्रकल्पातूनही उदगीरसाठी पाण्याच्या योजना़़़ बोअर, हातपंपांची कमी नाही़़़ तरीही उदगीर यंदा न भूतो परिस्थितीतून जात आहे़ भीषण टंचाईने त्रासलेल्या उदगीरातीलच काही युवक दोन दिवसांपूर्वीच एकत्र आले अन् त्यांनी जलयुक्त उदगीरची संकल्पनेवर चर्चा केली़ त्यास मूर्त रुप देण्यासाठी बैैठकही घेतली़ त्यात अवघ्या तासाभरात तब्बल ९ लाख रुपये जमा झाले़उदगीर शहर सध्या भीषण पाणीटंचाईस सामोरे जात आहे़ या शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व़यशवंतराव चव्हाण यांनी बनशेळकी येथे तलावास मंजुरी दिली अन् काम पूर्ण झाल्यानंतर ते पालिकेच्या मालकीचे करुनही टाकले़ या तलावातूनच बरीच वर्षे उदगीरकरांची तहान भागली़ परंतु, वाढता विस्तार, लोकसंख्या या घटकांमुळे पाणीपुरवठा अपुरा ठरु लागला़ त्यानंतर भोपणी प्रकल्पातून अन् देवर्जन प्रकल्पातून योजना घेण्यात आल्या़ मात्र, बनशेळकी व भोपणी प्रकल्प यंदा पूर्णपणे कोरडे पडले़ तर देवर्जन प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आहे़ त्यामुळे उदगीरच्या टंचाईत भर पडली आहे़ नागरिक मिळेल तेथून पाणी मिळवीत आहेत़ दरम्यान, या टंचाईतून बोध घेत उदगीरमधील मनोज पुदाले, उत्तम मोरे, रवी मलगे या तीन युवकांनी एकत्र येवून ‘जलयुक्त उदगीर’चा संकल्प मांडला़ मित्रमंडळींकडे चर्चा केल्यानंतर त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला़ त्यांच्या मित्रमंडळींनी ५ लाख रुपये जमवले़ यानंतर या उपक्रमास सार्वजनिक रुप देण्यासाठी या युवकांनी उदगीरकरांना बैैठकीसाठी आवाहन केले़ त्यास चांगला प्रतिसाद मिळून अवघ्या तासाभरात एकूण ९ लाख रुपये जमा झाले़ आता मदतीचा ओघ वाढविण्यासाठी समित्या स्थापन करुन उदगीरातील दानशुरांकडे या कामास हातभार लावण्यासाठी विनंती करण्याचे काम सुरु झाले आहे़जमा होणाऱ्या रकमेतून बनशेळकी तलावात गाळ उपश्याचे काम हाती घेतले जाणार आहे़ जवळपास १० फुट खोलीपर्यंत हा उपसा करण्याचा मानस बैैठकीत मान्यवरांनी व्यक्त केला़ त्यातून निघणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत काढून देण्यात येणार आहे़ गाळ उपश्यासाठी लागणारी यंत्रणा व त्याचा खर्च ही समिती लोकसहभागातून जमलेल्या रकमेतून करणार आहे़ शेतकऱ्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावयाचा आहे़ या कामास गती देवून ते ५ मे पासून सुरु करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले़(वार्ताहर)जलयुक्त उदगीरसाठी बोलाविण्यात आलेल्या बैैठकीत मनोज पुदाले १ लाख, प्रदीप कापसे ५० हजार, शंकर मुक्कावार ५० हजार तर गोपाळ मुक्कावार, विजयकुमार भीमाशंकर पारसेवार, नितीन भेंडे, उत्तम मोरे, रवी मलगे, मनोज धावडे, मनोज कोटलवार, रामदास जळकोटे, अभिजीत पुदाले यांनी मिळून ३ लाख रुपये असे एकूण ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली़ त्यानंतर शिवाजी गुरुडे यांनी औद्योगिक वसाहतीकडून १ लाख तर उदगीर अर्बन बँकेकडून ५१ हजार, अशोकराव पाटील एकंबेकर यांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळाकडून १ लाख, रमेश अंबरखाने यांनी ५१ हजार, विनोद टवाणी यांनी ५१ हजार, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़दत्ता पाटील यांनी २१ हजार, डॉ़संजय कुलकर्णी यांनी २१ हजार, राम मोतीपवळे यांनी ४२००, सुरेश पाटील नेत्रगावकर यांनी दोन टिप्पर देण्याचे जाहीर केले़