जालन्याच्या घेवरची राज्याला मोहिनी!
By Admin | Updated: January 6, 2017 23:52 IST2017-01-06T23:49:04+5:302017-01-06T23:52:22+5:30
जालना शहरातील बाजारपेठेत घेवर- फेणीची दुकाने सजू लागली की मकरसंक्रांतीचा गोड सण जवळ आल्याचे जाणवते.

जालन्याच्या घेवरची राज्याला मोहिनी!
हरी मोकाशे जालना
बाजारपेठेत तीळ- गुळाची आवक वाढली की, सर्वांना मकरसंक्रांती सणाची चाहूल लागते. परंतु, जालना शहरातील बाजारपेठेत घेवर- फेणीची दुकाने सजू लागली की मकरसंक्रांतीचा गोड सण जवळ आल्याचे जाणवते. सध्या शहरात विविध ठिकाणी घेवर- फेणीची निर्मिती सुरु झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, या घेवर- फेणीने राज्यालाच मोहिनी घातली आहे.
प्रत्येक शहराची ओळख ही वेगवेगळ्या पदार्थांनी होत असते. त्याचप्रमाणे शहराचा गोडवा हा घेवर-फेणीचा आहे. घेवर-फेणी हा पदार्थ राजस्थानातील होय. मकर संक्रांतीनिमित्त तेथील मारवाडी समाजातील महिला सुनेचे तोंड या पदार्थाने गोड करतात. तसेच नातेवाईकांना हा पदार्थ देऊन गोडव्याचा आनंद द्विगुणित केला जातो. सध्या शहरात जवळपास १८ ठिकाणी या पदार्थाची दुकाने थाटली आहेत. या घेवर- फेणीस शहरासह औरंगाबाद, पुणे, नांदेड, परभणी, बीड, परळी, सेलू, मानवत आणि हैदराबाद येथून मागणी असल्याचे व्यावसायिक कैलास दायमा यांनी सांगितले.