शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जालना रोडच्या विकास निधीत घसरण सुरूच; ४०० कोटींची घोषणाकरून तरतूद फक्त ६६ कोटींचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 19:18 IST

मूळ प्रकल्पातील सर्व उड्डाणपुले व इतर सुविधा रद्दच झाल्या आहेत. 

- विकास राऊत

औरंगाबाद : जालना रोडचे काम ४०० कोटींहून २४५ कोटींत करा, नंतर ते १०४ कोटींमध्येच करण्याचे आदेश देण्यात आले आणि आता ६६ कोटींतच ते काम गुंडाळा असा निर्णय केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने घेतल्यामुळे त्या प्रकल्पात तिसऱ्यांदा सुधारणा करीत ४० कोटींची कपात केल्याची माहिती पुढे आली आहे. बीड बायपासचे काम एनएचएआयच्या अंतर्गत येण्यात शासकीय अडथळा निर्माण झाल्याचे सांगून ते काम आता रद्द केले आहे, तर जालना रोडच्या कामात जून ते जानेवारी या सहा महिन्यांत तीन वेळेस निधीची तरतूद बदलली आहे. त्याुमळे जालना रोडचे काम ६६ कोटींतून कसे करणार, हा प्रश्न आहे. मूळ प्रकल्पातील सर्व उड्डाणपुले व इतर सुविधा रद्दच झाल्या आहेत. 

डिसेंबर २०१५ मध्ये जालना रोड आणि बीड बायपाससाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर जून २०१८ मध्ये गडकरी यांनी दोन्ही प्रकल्पांसाठी २४५ कोटींची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रपरिषदेत केली. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात १०४ कोटींतून जालना रोडचे काम करण्याचा अंतिम निर्णय झाल्यानंतर आता जानेवारीत ६६ कोटींतूनच काम करण्याच्या सूचना आहेत.सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी यू. जे. चामरगोरे यांनी जालना रोड आणि बीड बायपासचा एनएचएआयच्या मुख्यालयास  सादर केलेला  डीपीआर गुंडाळून ठेवण्यात आला आहे. 

औरंगाबादकरांच्या तोंडाला पुसली पाने जालना रोड आणि बीड बायपासच्या कामाप्रकरणी एनएचएआयने औरंगाबादकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. जालना रोडची एकूण लांबी १४ कि़मी. आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ७८९ कोटी इतकी होती. सहा पदरांमध्ये सर्व्हिस रोड, सायकल ट्रॅक, फुटपाथसह ४५ ते ६० मीटर डीपी रोडचा समावेश होता.२ तीन उड्डाणपुले, ६ भुयारी मार्ग, दोन रेल्वे उड्डाणपुलांचा मूळ डीपीआर होता. २०१७ मध्ये जालना रोडवरील उड्डाणपुलांची संख्या ५ वरून ३ केली. मुकुंदवाडी आणि चिकलठाणा येथील उड्डाणपुले रद्द करण्यात आली, तर बीड बायपासचा ३८९ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्यात आला आहे. 

जालना रोडसाठी घोषणाडिसेंबर २०१५    ४०० कोटीजून २०१८    २४५ कोटीडिसेंबर २०१८     १०४ कोटीजानेवारी २०१९    ६६ कोटी  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग