जालन्याचे पोलिस तणावग्रस्तच..!
By Admin | Updated: May 9, 2015 00:53 IST2015-05-09T00:40:14+5:302015-05-09T00:53:10+5:30
गंगाराम आढाव / गजानन वानखडे जालना अतिकामांमुळे पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण वाढत आहे. तणावाखालीच काम करावे लागत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून,

जालन्याचे पोलिस तणावग्रस्तच..!
नवी दिल्ली : पहिल्यांदा आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले तेव्हा मला ‘वेडा’ ठरविण्यात आले होते. आॅलिम्पिक रौप्यपदक विजेते नेमबाज आणि केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत ही आठवण ताजी केली.
ट्रॅप शूटर राहिलेले अर्जुन पुरस्कारप्राप्त राठोड यांनी २००४च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते. त्यापूर्वी भारताला वैयक्तिक स्पर्धेत पदक मिळाले नव्हते. नंतर २००८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदकाची कमाई केली. एका समारंभात राठोड यांनी हा
किस्सा ऐकविला. ते
म्हणाले,‘‘मी आॅलिम्पिकची तयारी सुरू केली तेव्हा लोक मला वेड्यात काढत होते.
मी कठोर मेहनत घेतली आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी स्वत:ला समर्पित केले. कुठलेही काम हातात घेतल्यानंतर ते तडीस नेण्याची समर्पणवृत्ती अंगी बाळगल्यास यश अधिक काळ हुलकावणी देऊ शकत नाही, हे माझ्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे.’’ (वृत्तसंस्था)