जालना नगराध्यक्षपद; भाजपाने घेतली माघार

By Admin | Updated: November 11, 2016 00:23 IST2016-11-11T00:25:21+5:302016-11-11T00:23:48+5:30

जालना : जालना नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार सुशीलाबाई भास्कर दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Jalna municipal councilor; BJP retracted | जालना नगराध्यक्षपद; भाजपाने घेतली माघार

जालना नगराध्यक्षपद; भाजपाने घेतली माघार

जालना : जालना नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवार सुशीलाबाई भास्कर दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीतून भाजपाने माघार घेतली.
गुरूवारी नगराध्यक्षपदाचे चार तर नगरसेवक पदांचे १७ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यात प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी खान सरताज बेगम अफसर, सुशीलाबाई भास्कर दानवे, पठाण मरियाबी गुलाबखा, खान अमरीन नूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर नगरसेवकपदासाठी दोन ब, एक अ, २४ अ, १८ ब, १६ ब, १२ ब, २४ ब, १२ अ, १९ ब, २ अ, २१ ब , १ अ, १ ब, ७ क, २ ब, १ ब, १० ब या प्रभागातून १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Jalna municipal councilor; BJP retracted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.