जालना बाजार समितीत तुरीला १३ हजारांचा भाव..!

By Admin | Updated: December 7, 2015 01:05 IST2015-12-07T01:02:38+5:302015-12-07T01:05:19+5:30

जालना : जालना बाजार समितीत तुरीला तब्बल १३ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त हा भाव असल्याचे व्यापाऱ्यांचा दावा आहे.

Jalna market committee has bought 13 thousand rupees! | जालना बाजार समितीत तुरीला १३ हजारांचा भाव..!

जालना बाजार समितीत तुरीला १३ हजारांचा भाव..!

जालना : जालना बाजार समितीत तुरीला तब्बल १३ हजार रुपयांचा विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त हा भाव असल्याचे व्यापाऱ्यांचा दावा आहे.
अत्यल्प पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यातच तुरीच्या डाळीचे भाव कडाडल्याने तुरीला महत्व आले आहे. साठेबाजारांवर कारवाई झाल्याने तुरीचा साठा शिल्लक नाही. परिणामी जालना बाजारपेठेत तुरीला शुक्रवारी तुरीला प्रति क्विंटलला १३ हजार १०० रूपयांचा विक्रमी भाव मिळाला. शुक्रवारी ५०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची आवक झाल्याचे आडत व्यापारी सुदर्शन भुंबर म्हणाले. शनिवारी हा भाव साडे अकरा ते साडेबारा हजारांवर भाव स्थिरावल्याचे ते म्हणाले. उत्पादन कमी असल्याने तसेच आगामी काळात पुन्हा भाव वधारण्याची चिन्हे असल्याने व्यापारीही तूर खरेदी करीत आहेत.

Web Title: Jalna market committee has bought 13 thousand rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.