जालना जिल्ह्यात ४१ टक्के मतदान
By Admin | Updated: June 21, 2014 00:56 IST2014-06-21T00:23:22+5:302014-06-21T00:56:03+5:30
जालना : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात अंदाजे ४१ टक्के मतदान झाले आहे.
जालना जिल्ह्यात ४१ टक्के मतदान
जालना : महाराष्ट्र विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात अंदाजे ४१ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५२ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदारांनी आपला हक्क बजावला.
जिल्ह्यात एकूण २४ हजार ९७८ पदवीधर आहेत. यापैकी सुमारे ४१ टक्के मतदान झाल्याचे निवडणुक विभागाने कळविले आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेसाठी ३१२ कर्मचारी, २४ क्षेत्रिय अधिकारी, ५२ सूक्ष्म निरीक्षक आणि ४० राखीव कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी हे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. (प्रतिनिधी)