जालन्यात ३६ हजारांचा गुटखा पकडला
By Admin | Updated: May 1, 2015 00:49 IST2015-05-01T00:41:02+5:302015-05-01T00:49:18+5:30
जालना: गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांकडून ३६ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व प्रशासन विभागाने बुधवारी रात्री केली.

जालन्यात ३६ हजारांचा गुटखा पकडला
जालना: गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांकडून ३६ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व प्रशासन विभागाने बुधवारी रात्री केली.
देऊळगावराजा मार्गावरून मोटार सायकलवर दोघेजण अवैधरित्या गुटखा घेवून जात असल्याची माहिती मिळाल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाई केली.
याप्रकरणी अन्न निरीक्षक प्रज्ञा सुरूवसे यांच्या तक्रारीवरून शेख सोहेल शेख अजिम (रा. आर.पी रोड) व शेख नदीम शेखनईम रा. कुंभार गल्ली या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून ३६ हजारांचा गुटखा व मोटार सायकल जप्त केली. (प्रतिनिधी)