जालना पालिकेचा कारकून एसीबीच्या सापळ्यात
By Admin | Updated: August 31, 2014 01:08 IST2014-08-31T00:42:29+5:302014-08-31T01:08:34+5:30
जालना : वडिलोपार्जित मालमत्तेची वारसा हक्काने घेण्यासाठी ७०० रूपयांच्याा लाच स्वीकारतांना नामदेव साळूजी म्हस्के या वसूल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

जालना पालिकेचा कारकून एसीबीच्या सापळ्यात
जालना : वडिलोपार्जित मालमत्तेची वारसा हक्काने घेण्यासाठी ७०० रूपयांच्याा लाच स्वीकारतांना नामदेव साळूजी म्हस्के या वसूल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. हा प्रकार ३० आॅगस्ट रोजी दुपारी ११.४५ वाजता घडला.
शहरातील शास्त्री मोहल्ला जुना जालना भागातील ३-१-७१ या मालमत्तेची नोंद वारसा हक्काने घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. हे काम वसूली कारकून नामदेव म्हस्के यांच्याकडे होते. १० दिवसानंतरही नामांतर होत नसल्याचे तक्रारदाराने म्हस्के यांना सांगितले. त्यावेळी म्हस्के याने वरिष्ठांकडे संचिका सादर करण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची मागणी केली. यात प्रकरणात तक्रारदार व म्हस्के यांच्यात तडजोड होऊन सदर प्रकरणात ७०० रूपये देऊन काम करून देण्याचे ठरले. मात्र दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली. पथकाने आज शनिवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास छापा मारून म्हस्केला रंगेहात पकडले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.