जि.प.सीईओ खोडवेकर यांच्या चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 23:47 IST2017-07-28T23:47:30+5:302017-07-28T23:47:30+5:30
परभणी : जि.प.चे सीेईओ सुशील खोडवेकर यांच्या कारभाराची चौकशी करुन याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर करावा, असे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.

जि.प.सीईओ खोडवेकर यांच्या चौकशीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जि.प.चे सीेईओ सुशील खोडवेकर यांच्या कारभाराची चौकशी करुन याबाबतचा अहवाल सभागृहाला सादर करावा, असे आदेश सभापती रामराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.
या संदर्भात आ.बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यामध्ये पूर्नपडताळणी शिफारसपात्र शिक्षकांना पदस्थापना देण्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश व शिक्षण संचालकांचे निर्देश असतानाही सुशील खोडवेकर यांनी विविध कारणे दाखवून २०१० मधील डी.एड.सीईटी उत्तीर्ण शिफारसपात्र २० उमेदवारांना पदस्थापना दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ.दुर्राणी यांनी केली होती. या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ.हेमंत टकले यांनीही जोरदार आक्षेप नोंदविला व खोडवेकर यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. राज्यमंत्री दादा भुसे यांनी शासनाच्या वतीने बाजू मांडली. सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी खोडवेकर यांची चौकशी करुन विधान परिषदेत अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाला दिले.