सुवालाल बाफना यांना जैन समाजरत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:57 IST2017-09-09T00:57:50+5:302017-09-09T00:57:50+5:30
भारत जैन महामंडळाच्या वतीने जैन समाजसेवक सुवालाल बाफना यांना ‘जैन समाजरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुवालाल बाफना यांना जैन समाजरत्न पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारत जैन महामंडळाच्या वतीने जैन समाजसेवक सुवालाल बाफना यांना ‘जैन समाजरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. सी. जैन यांनी ही घोषणा केली. हा पुरस्कार त्यांना १० सप्टेंबर रोजी तेरापंथ भवन, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदीवली, मुंबई येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.
बाफना हे अखिल भारतीय श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष आहेत. पद्मश्री बाफना यांनी हा पुरस्कार म्हणजे गुरुदेव यांचा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे. शैक्षणिक, आरोग्य क्षेत्र आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या विकासासाठी ते यापुढेही कार्य करीत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उल्लेखनीय म्हणजे जैन समाजातील एकतेचे प्रतीक, चार पंथांचे प्रतिनिधित्व करणाºया भारत जैन महामंडळ असे महामंडळ आहे की, चार पंथांमध्ये वैशिष्टपूर्ण कार्य करणाºया व्यक्तीला ‘जैन समाजरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करीत
असते.