जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा आज हिंगोलीत
By Admin | Updated: June 24, 2014 00:07 IST2014-06-23T23:56:20+5:302014-06-24T00:07:02+5:30
हिंगोली : भारतीय जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा २४ जून रोजी महावीर भवन येथे येणार असून तेथे सभा होणार आहे.

जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा आज हिंगोलीत
हिंगोली : भारतीय जैैन संघटनेची परिवर्तन यात्रा २४ जून रोजी महावीर भवन येथे येणार असून तेथे सभा होणार आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पारख यांचे मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी आ. ओमप्रकाश पोकर्णा राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय मंत्री महेश कोठारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पारसमल ओसवाल, राज्य सचिव अभिनंद खोत, राज्य उपाध्यक्ष झुंबरलाल मुथा, विभागीय अध्यक्ष आनंद जैैन, सुंदरलाल सावजी बँकेचे अध्यक्ष मुुंकुद सावजी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
संयोजक प्रकाशचंद्र सोनी, रत्नाकर महाजन, धरमचंद्र बडेरा, इंदरचंद्र सोनी, तेजकुमार झांजरी, मिलिंंद यंबल, तिलोकचंद्र सोनी, नरेंद्र दोडल, डॉ. प्रेमेंद्र बोथरा, सुशील जोगड, बालाजी उखळकर, विलास बुरूसे, विनोद राके, रवींंद्र सोनी, किशोर मास्ट, प्रा. जयेंद्र शहा, प्रा. मधुकर डहाळे, कांतीलाल गोलेच्छा, राजकुमार रुणवाल, अनिल सोनी, सुदर्शन कंदी, बबनराव गोरे, पुष्पाताई सुराणा, सोनाली परतवार, वर्षा आचलिया, वंदना सोवितकर आहेत.
जिल्ह्यातील जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविकुमार कान्हेड व जिल्हा सचिव पारसमल जैन यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)