खून करून फरार झालेला आरोपी जेरबंद
By Admin | Updated: June 9, 2014 00:11 IST2014-06-08T23:29:52+5:302014-06-09T00:11:21+5:30
जालना : जाफराबाद तालुक्यातील पोखरी पाराची येथे पत्नीच्या प्रियकराचा खून करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले

खून करून फरार झालेला आरोपी जेरबंद
जालना : जाफराबाद तालुक्यातील पोखरी पाराची येथे पत्नीच्या प्रियकराचा खून करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. या आरोपीने ५ जून रोजी खून केला होता.
बाळू नारायण निकस (३०) या इसमाने खून केल्यानंतर तो पळून गेला होता. सदर प्रकरणी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी सापडत नसल्याने हा तपास पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या टीपनुसार सदर आरोपी हा जालना तालुक्यातील रेवगाव शिवारात असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक निरीक्षक विनोद पवार, कल्याणराव आटोळे, अर्जुन पवार, रवि जोशी, डॅनियल जाधव, तानाजी कानुरे, समाधान तेलंगे्र, राम शेंडीवाले यांनी आरोपीला शिताफीने अटक केली. हा खून केल्याची पोलिसांना कबुलीही दिली.(प्रतिनिधी)