जिल्ह्यात बचत गटांची चळवळ थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:30 IST2017-07-28T00:30:25+5:302017-07-28T00:30:25+5:30

नांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़

jailahayaata-bacata-gataancai-calavala-thandaavalai | जिल्ह्यात बचत गटांची चळवळ थंडावली

जिल्ह्यात बचत गटांची चळवळ थंडावली

भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील दीड वर्षापासून गट समन्वयकांच्या अनेक जागा रिक्त असल्याने ग्रामीण भागातील महिला बचतगटांची चळवळ थंडावली आहे़ आर्थिक पुरवठा करणाºया बँकांना बचत गटांच्या उन्नतीचे काहीच घेणे- देणे नसल्यामुळे अधिक कमकुवत झालेले बचत गट आता समन्वय नसल्याने वाºयावर आहेत़
जिल्ह्यात गट समन्वयकांच्या १३ जागा रिक्त आहेत़ ३३ पैकी १९ जागेवर हे गट समन्वयक कार्यरत आहेत़ तसेच समुह संसाधन व्यक्तीच्या नियुक्त्याही करण्यात आल्या नाहीत़ प्रत्येक दहा गटासाठी एक समूह संसाधन व्यक्ती या प्रमाणे निवड होणे आवश्यक आहे़ गट समन्वयक व समूह संसाधन व्यक्ती नसल्याने या गटांना मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे़
जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़ जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व गटसमन्वयक यांनी बँक मेळाव्याचे आयोजन करणे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा बँक शाखामध्ये बँक मेळावे घेणे आवश्यक आहे़
दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाºया कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटांचे माध्यम आधारभूत ठरले असले तरी सध्या अनेक बचत गट मोडकळीस आले आहेत़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत बचत गटांची चळवळ जोमाने सुरू होती़ परंतु प्रशासकीय यंत्रणा व बँकेच्या असहकार्यामुळे बचत गटांचा आर्थिक विकास थांबला आहे़ जिल्ह्यातील विविध बँक शाखेत डीआरडीच्या बचतगटांचे कर्ज प्रकरणे पडून आहेत़ या गटांना कर्ज पुरवठा करण्यास बँकांची तयारी नाही़ ‘विना कारण, विना तारण’ या तत्वावर बँकांनी बचत गटांना १ लाख २५ हजार रूपयापर्यंत कर्ज पुरवठा करणे आवश्यक आहे़ परंतु या तत्वांचा विसर बँकांना पडला आहे़ दारिद्र्य रेषेखालील बचत गटांची पत तसेच पाठपुरावा करणाºया यंत्रणेची कमतरता असल्याने या कर्ज प्रकरणांकडे कोणाचेही लक्ष नाही़
दुसरीकडे प्रशासकीय स्तरावरून या गटांच्या विकासासाठी प्रयत्न करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे़ त्यामुळे गटांची परिस्थिती दयनीय झाली आहे़ दरम्यान, बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचाही विसर प्रशासनाला पडला आहे़

Web Title: jailahayaata-bacata-gataancai-calavala-thandaavalai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.