जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:28 IST2017-07-28T00:28:29+5:302017-07-28T00:28:29+5:30
नांदेड : सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे पीकविमा भरण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा भरता येणार आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा स्वीकारून तो विमा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे़

जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा स्वीकारणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे पीकविमा भरण्यात अडचणी येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकºयांना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेतही पीकविमा भरता येणार आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकांना ३१ जुलैपर्यंत पीकविमा स्वीकारून तो विमा पोर्टलवर समाविष्ट करण्यासाठी कालावधी वाढवून देण्यात आला आहे़
पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांच्या बँका तसेच सीएएस सेंटरवर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत़ त्यात सॉफ्टवेअर बंद पडल्याने शेतकºयांना आल्या पावली माघारीही फिरावे लागत आहे़ पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांकडून करण्यात आली आहे़ या मागणीसंदर्भात निर्णय झाला नसला तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत शुक्रवारपासून पिकविमा भरण्याची परवानगी देण्यात आली आहे़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ़ प्रताप पाटील चिखलीकर यांनी राज्य व केंद्र शासनातील पदाधिकारी व अधिकाºयांशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थिती सांगितली़ विमा कंपनी व मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेनंतर राज्यातील सर्व बँकामध्ये पीकविमा भरण्याचा निर्णय घेण्यात आला़ प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकºयांना पीकविमा आॅनलाईन भरण्यासाठी सीएसपी सेंटरवर तासनतास ताटकळत बसत आहेत़ जिल्हा बँकामध्ये आॅफलाईन किंवा आॅनलाईन विमा भरण्यासाठी सॉफ्टवेअरच्या अडचणी वाढत चालल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून शेतकºयांकडून विमा स्वीकारणे जवळपास बंदच आहे़
पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची होत असलेली गर्दी पाहता जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना वेळेचे बंधन न पाळता शेतकरी बँकेत असेपर्यंत पीकविमा भरण्याचे काम करण्याचे निर्देश दिल्याचेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ़ चिखलीकर यांनी सांगितले़ ३० जुलै रोजी रविवार असला तरी पीकविमा स्वीकारण्याचे काम सुरू राहणार आहे़
गतवर्षी जिल्हा बँकेने खरीप हंगामात ७५ हजार ९५६ शेतकरी सभासदांचा विमा स्वीकारला होता़ विम्यापोटी ७ कोटी १९ लाख ५६ हजार रूपये जमा करण्यात आले होते़ त्यातून शेतकºयांना पिकांच्या नुकसान भरपाईपोटी १५२ कोटी ३२ लाख ३४ हजार रूपये प्राप्त झाले होते़