जायकवाडी- जालना जलवाहिनीची दुरुस्ती

By Admin | Updated: November 30, 2015 23:30 IST2015-11-30T23:16:10+5:302015-11-30T23:30:08+5:30

जालना : अंबडपासून जवळच जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेचा व्हॉल्व्ह फुटल्यामुळे रविवारी शेकडो लीटर पाणी वाया गेले.

Jaikwadi-Jalna Water Station Correction | जायकवाडी- जालना जलवाहिनीची दुरुस्ती

जायकवाडी- जालना जलवाहिनीची दुरुस्ती


जालना : अंबडपासून जवळच जायकवाडी- जालना पाणीपुरवठा योजनेचा व्हॉल्व्ह फुटल्यामुळे रविवारी शेकडो लीटर पाणी वाया गेले. यामुळे जालना शहरवासियांना आगामी तीन ते चार दिवस निर्जळीचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम पूर्ण केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
रविवारी दुपारी व्हॉल्व्ह नादुरूस्त होऊन लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे जुना जालना भागातील जलकुंभ भरण्यास अडचण आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण केल्याचे पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे यांनी सांगितले. जलवाहिनी पूर्ववत झाल्याने पाणी प्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Jaikwadi-Jalna Water Station Correction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.