शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जायकवाडीत एक टक्का पाणी वाढले; धरण अद्यापही मृतसाठ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:12 IST

रात्रीतून धरणाच्या जलसाठ्यात १ टक्का वाढ झाली

ठळक मुद्दे नांदूर-मधमेश्वर कालव्यामधून गोदावरी पात्रात आवक धरणात येणारी आवक कायम राहिली, तर सोमवारपर्यंत धरणात आणखी १ टक्का वाढ

पैठण (औरंगाबाद ) : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर-मधमेश्वर कालव्यामधून गोदावरी पात्रात २३,९५९ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत असून, हे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. जायकवाडी धरणात १८,४७७ क्युसेक क्षमतेने रविवारी आवक सुरू होती. रात्रीतून धरणाच्या जलसाठ्यात १ टक्का वाढ झाली असून, धरणात १६.५३ दलघमी (अर्धा टीएमसी) नवीन पाण्याची भर पडली आहे. धरण अद्यापही मृतसाठ्यात आहे.  

धरणात येणारी आवक कायम राहिली, तर सोमवारपर्यंत धरणात आणखी १ टक्का वाढ होण्याची अपेक्षा धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अजमेरा यांनी व्यक्त केली आहे. शनिवारी नाशिक जिल्ह्यातील करंजवन १७ मि.मी., वाघाड ३४, ओझरखेड ७, पालखेड ३, गंगापूर ५१, गौतमी ८०, कश्यप ४३, कडवा ३७, दारणा ३४, भावली १२०, नांदूर मधमेश्वर २० मि.मी., अशी पावसाची नोंद झाली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील दारणा धरणातून १३,०५८ क्युसेक, कडवा धरणातून ३,७०८ असा विसर्ग शनिवारी दुपारपासून सुरू करण्यात आला. या दोन्ही धरणांचा विसर्ग नांदूर मधमेश्वर कालव्यात पोहोचताच नांदूर मधमेश्वर वेअरमधून २३,९५९ क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नांदूर मधमेश्वर ते पैठणदरम्यान गोदावरी भरलेली असल्याने अवघ्या १५ तासांत हे पाणी जायकवाडी धरणात येऊन पोहोचले.रविवारी सायंकाळी धरणाची पाणीपातळी १,४८९.२० फूट होती, धरणात ४५३.९०८ दलघमी एकूण जलसाठा असून धरणात -९.३७ टक्के जलसाठा आहे.

मृतसाठ्यातून २१० दलघमीचा वापरजायकवाडी धरणाचा जलसाठा २२ मार्च रोजी मृतसाठ्यात गेला. तेव्हापासून जायकवाडीतून पिण्यासाठी व औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २२ मार्च ते २८ जुलैदरम्यान धरणाच्या मृतसाठ्यातून २१० दलघमी (७.४१ टीएमसी) पाण्याचा उपसा झाला आहे. मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात येण्यासाठी अद्यापही २२६.५४६ दलघमी (८ टीएमसी) पाण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील नाशिक जिल्ह्यातील धरणाचा जलसाठा-करंजवण     १६.२२%,

वाघाड         ३१.९१%ओझरखेड     ३.५२%.पालखेड         ५२.८७%गंगापूर         ७४.३५%. गौतमी         ५८.०३%.कश्यपी         ४८.२७%कडवा         ८९.४०%. दारणा         ८६.७६%.भावली         १००%.मुकणे         ३४.३७%.नांदूर मधमेश्वर ९६.४९%. 

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातील जलसाठा-भंडारदरा         ५८.६१%.निळवंडे         २५.०८%.मुळा         २३.५७%.पुणेगाव         ०.२४%.तीसगाव         ०००%.वालदेवी         ८२.४३%.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाRainपाऊसWaterपाणी