जायकवाडीतील आवक वाढणार
By Admin | Updated: September 3, 2014 00:20 IST2014-09-03T00:12:33+5:302014-09-03T00:20:54+5:30
पैठण : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात ९,००० क्युसेक्स क्षमतेने आवक होत आहे. धरणात २६ टक्के जलसाठा झाला आहे.

जायकवाडीतील आवक वाढणार
पैठण : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात ९,००० क्युसेक्स क्षमतेने आवक होत आहे. धरणात २६ टक्के जलसाठा झाला आहे. वरील धरणांतून विसर्ग वाढविण्यात येत असल्याने आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वरील धरणांतून भंडारदरा- ३२४८, दारणा- १४१०, गंगापूर-२६८, ओझर वेअर- २१८, निळवंडे-१२०० व नांदूर-मधमेश्वरमधून ९४६५ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे धरणात ९,००० क्युसेक्स आवक सुरू आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणी पातळी आज सायंकाळी १५०४.७१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १३०१.१५९ द.ल.घ.मी. झाला असून, यापैकी ५६३.०५३ द.ल.घ.मी. जिवंत जलसाठा आहे.