जायकवाडी @ 70
By Admin | Updated: September 26, 2016 00:37 IST2016-09-26T00:24:52+5:302016-09-26T00:37:41+5:30
पैठण : पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

जायकवाडी @ 70
पैठण : पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे जायकवाडीतील उपयुक्त साठा रविवारी तब्बल ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला. सध्याही धरणात १९,६५४ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू आहे. त्यामुळे हा पाणीसाठा आणखी वाढणार आहे.
दमदार पावसामुळे जायकवाडी धरणात चार दिवसांपासून पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातील साठा दररोज वाढत आहे. २४ तासांत धरणात १.०५ टीएमसी पाण्याची भर पडल्याचे धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. सध्या नाशिक जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुळा व ओझर वेअर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे रविवारी दुपारपासून धरणात पाण्याची आवक वाढली.
रविवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा १५१६ फुटांपर्यंत पोहोचला. धरण भरण्यासाठी आणखी ६ फूट पाणी धरणात येणे आवश्यक आहे. सध्या धरणात एकूण जलसाठा २२५२ दलघमी (८० टीएमसी) एवढा झाला आहे. तर उपयुक्त जलसाठा १५१४ दलघमी (५४ टीएमसी) आहे. गेल्या ४८ तासांत धरणात २ टीएमसीने भर पडली आहे.