जायकवाडी @ १४.५० %

By Admin | Updated: August 9, 2014 00:56 IST2014-08-09T00:34:56+5:302014-08-09T00:56:25+5:30

जायकवाडीच्या पाणी पातळीत आठ दिवसांत साडेपाच फुटाने वाढ झाली आहे.

Jaikwadi @ 14.50% | जायकवाडी @ १४.५० %

जायकवाडी @ १४.५० %

पैठण : पाणलोट क्षेत्रातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जायकवाडी धरणात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाण्याची आवक होत आहे. जायकवाडीच्या पाणी पातळीत आठ दिवसांत साडेपाच फुटाने वाढ झाली आहे. धरणात साडेचौदा टक्के जलसाठा झाला आहे. आज सायंकाळी धरणात ६०३३ क्युसेक्स दराने पाण्याची आवक सुरू होती.
गंगापूर धरण-१५२६, दारणा धरण-६२२४ क्युसेक्स व नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १३५७० क्युसेक्स विसर्ग आज सुरू होता. हे पाणी जायकवाडीमध्ये दाखल होत आहे.
मुळा- ५६.५० टक्के, भंडारदरा-८७.४५ टक्के, दारणा- ७९.६ टक्के, गंगापूर-८३.१६ टक्के, करंजवण-५७.३८ टक्के, पालखेड- ९४.७१ टक्के, नांदूर-मधमेश्वर-८५.६० टक्के असा वरील धरणांत जलसाठा आहे.

Web Title: Jaikwadi @ 14.50%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.