कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टीकर
By Admin | Updated: May 27, 2017 00:31 IST2017-05-27T00:24:52+5:302017-05-27T00:31:57+5:30
लातूर :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ स्टीकर लावून शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन केले.

कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’चे स्टीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास कर्नाटक शासनाने बंदी घातली आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ स्टीकर लावून शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानकात आंदोलन केले. कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. बंदी आदेश मागे नाही घेतला तर कर्नाटकाची एकही बस महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असा इशारा दिला. आंदोलनात किरण चव्हाण, मनोज अभंगे, किसन कदम, भागवत कागदे आदी सहभागी होते.