संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात जय भीमचा नारा
By Admin | Updated: April 18, 2017 23:54 IST2017-04-18T23:50:27+5:302017-04-18T23:54:21+5:30
रामनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात उत्साहात साजरी झाली.

संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात जय भीमचा नारा
रामनगर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात उत्साहात साजरी झाली. यावेळी जय भीमच्या नाऱ्यांमुळे परिसर दणाणून गेला होता.
यावर्षी प्रथमच तिथे जयंती साजरी करण्यात आली. मूळचे जालना जिह्यातील रहिवासी असलेले दिलीप म्हस्के हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या फाउंडेशन फॉर ह्युमन हॉरीझन या संस्थेने हे ऐतिहासिक कार्य केले आहे. या ऐतिहासिक जयंती सोहळ्यास युनायटेड नेशन्सचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमिना जे. मोहम्मद, डॉ. जुलिया ग्लीडेन, गुगल चे क्र ीएिटव्ह हेड आॅलिव्हर राबेन्सचाग, प्रोफेसर स्टेन काचोन्वास्की, केथ्रीन न्यूमन, स्टेट बँक आॅफ इंडियाचे अमेरिकेचे हेड पद्मजा चंद्रू व ‘द इंडिया नेटवर्क’ चे राहुल नार्वेकर उपस्थित होते. या सर्वांचा सत्कार दिलीप म्हस्के यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आला. डॉ. आंबेकडकर जयंती निमित्त इंपॉविरंग पिपल थ्रु डिजीटल टेक्नोलॉजी फॉर सोशल अॅण्ड फायनान्स इलुजन या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या जयंतीचे आयोजन युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयात अमेरिकन प्रमाणवेळेनुसार १३ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत व भारतीय दुतावासात १४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत करण्यात आले. युनायटेड नेशन्स डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने प्रेरित होवून जयंतीमध्ये संयुक्तिकरीत्या सहभागी झाली. यावेळी सर्वांनीच डॉ. बाबासाहेबांबद्दल आपले विचार प्रकट करून जागतिक दृष्टीने त्यांच्या विचारांचे आचरण किती महत्वाचे आहे हे यावेळी सांगितले. जयंती साजरी करण्याच्या आधी अमेरिकेतील सर्व भारतीयांनी खूप मोठी रॅलीचे आयोजन केले होते.
यावेळी अमेरिकन तसेच भारतीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (वार्ताहर)