आज दुमदुमणार जयभीमचा नारा
By Admin | Updated: April 14, 2016 01:20 IST2016-04-14T00:38:43+5:302016-04-14T01:20:23+5:30
औरंगाबाद : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत.

आज दुमदुमणार जयभीमचा नारा
औरंगाबाद : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. शहरात अपूर्व उत्साह दिसून येत असून, उद्या १४ एप्रिल रोजी अभिवादन, वाहन रॅली, मुख्य मिरवणुकीसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी शहर सजले आहे. ठिकठिकाणच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांजवळ आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घराघरांवर निळे ध्वज उभारण्यात आले आहेत. यंदा प्रथमच निळ्या रंगाचे आकाशकंदिल लावण्यात आले आहेत. जयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाईने शहर उजाळून निघाले होते. बाजारपेठेतही सजावटीचे विविध साहित्य खरेदीसाठी आज शहरवासीयांची झुंबड उडाली होती. कापड बाजारात नवीन कपडे खरेदीसाठीही गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांवर व रिक्षांवर निळे ध्वज लावण्यात आले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उद्या सकाळी कॉलनी-कॉलनीमध्ये आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक कॉलनीत आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. कॉलनीच्या मैदानात मंडप टाकण्यात आले आहेत. भडकलगेट परिसरातील डॉ. आंबेडकर यांचा पुतळा परिसर रोषणाईने उजाळून निघाला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने (पान २ वर)