जागरण गोंधळ करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
By | Updated: December 4, 2020 04:11 IST2020-12-04T04:11:14+5:302020-12-04T04:11:14+5:30
औरंगाबाद : ‘आई भवानी जागराला ये’ असे देवीला आवाहन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी रात्री जागरण गोंधळ आंदोलन करीत ...

जागरण गोंधळ करीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
औरंगाबाद : ‘आई भवानी जागराला ये’ असे देवीला आवाहन करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी रात्री जागरण गोंधळ आंदोलन करीत दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेतर्फे रात्री ९ वाजता आंदोलन करण्यात आले. शाहीर विजय काटे यांनी देवीचे गीत म्हणत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. हम सब एक है, शेतकरी संघटनेचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात होत्या. जर लवकर प्रश्न सोडविला नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, चंद्रशेखर साळुंके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, संपत रोडगे, सुनील शिंदे, आझम खान, संतोष निकम, अब्दुल रऊफ, शिवाजी हुसे, अन्वर आली, भाऊसाहेब शेळके यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले होते.