गावोगावी ग्रामस्थांचा जागर
By Admin | Updated: August 23, 2015 23:45 IST2015-08-23T23:35:20+5:302015-08-23T23:45:56+5:30
लोहारा : शहरासह तालुक्याच्या अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिस प्रशासनाकडून मात्र ही बाब गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे

गावोगावी ग्रामस्थांचा जागर
लोहारा : शहरासह तालुक्याच्या अनेक भागात गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिस प्रशासनाकडून मात्र ही बाब गांभिर्याने घेतली जात नसल्यामुळे काही गावात ग्रामस्थांनीच आता रात्रीची गस्त घालण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.
लोहारा (बु), धानुरी, जेवळी, कानेगाव, भातागळी या भागात रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याच्या ग्रास्थांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे इतर गावातही सावधगिरी म्हणून ग्रामस्थांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे. २२ आॅगस्ट रोजी देखील धानुरी येथील आनंद राठोड यांनी पोलिस ठाण्यात तक्रारी निवेदन दाखल केले आहे. यात त्यांनी २१ आॅगस्टच्या मध्यरात्री दहा ते पंधरा चोरटे आले होते. त्यांनी दारावर थाप मारून घरावरील पत्र्यावर दगडफेक केली. यावेळी आम्ही आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पसार झाले, असे त्यांनी तक्रारी म्हटले आहे. या चोरट्यांकडे चारचाकी व दुचाकी वाहने असून, कुत्रे देखील असल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान, याबाबत येथील पोनि संतोष गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात चोरट्यांच्या केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)