जाफराबादचा पाणीप्रश्न पेटणार

By Admin | Updated: December 23, 2016 00:19 IST2016-12-23T00:14:54+5:302016-12-23T00:19:01+5:30

जाफराबाद : शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर पंचायत जाफराबाद संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Jaffrababad's water question | जाफराबादचा पाणीप्रश्न पेटणार

जाफराबादचा पाणीप्रश्न पेटणार

जाफराबाद : शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगर पंचायत जाफराबाद संघर्ष समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खडकपूर्णा प्रकल्पातून सिल्लोड, भोकरदन शहराकरिता सव्वाशे कोटींची पाणीपुरवठा योजना जाफराबादमधून जात असल्याने या योजनेचे पाणी आपल्या गावासाठी मिळावे,अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी संघर्ष समिती स्थापन होत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तू तू- मै मै सुरु झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा नसरीनबेगम शेख सऊद व प्रभारी नगराध्यक्ष दीपक पाटील वाकडे ,विषय समिती सभापती यांनी आपले हक्काचे पाणी आपल्याला मिळायलाच पाहिजे, असा सूर अळवायला सुरूवात केली आहे. तर याच दिवशी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात जाफराबदला पाणी देण्यास आमचा विरोध नसल्याचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कार्याध्यक्ष राजभाऊ देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आता नगर पंचायतीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.
पाणी संघर्ष समिती स्थापन करून पाणी वाटपाबाबत काही ठोस निर्णय होत नाही. तो पर्यंत पाणी पुरवठा योजना हलू द्यायची नाही, अशी व्यूहरचना आखली जात आहे. या योजनमुळे नगर पंचायतच्या जुन्या पाणीपुरवठा योजना त्याच बरोबर अंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे मोठे नुकसान होणार आहे. खोदकामामुळे प्रमुख रस्त्यासह भारत संचार निगम, महावितरण कंपनी, व्यापारी यांचे देखील नुकसान करणार आहे.
जाफराबाद शहराला बहु प्रतीक्षेनंतर मिळालेली साडेतीन कोटी रूपयांची महत्वकांक्षी पाणीपुरवठा योजना अखेर कुचकामी ठरली आहे. योजना शुभारंभ प्रसंगी ग्राम पंचायत, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागा, यांच्यापासून ते राज्यभर योजनेचा गाजावाजा झाला असला तरी ती स्पेशल अपयशी ठरला आहे. पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यापासून नगर पंचायतीची सर्व यंत्रणा देखभाल दुरूस्तीसाठी दिवस रात्र राबून देखील गावकऱ्यांना पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे शहराची पाणी समस्या कायम आहे. (वार्ताहर)

Web Title: Jaffrababad's water question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.