जाफराबादेत चोऱ्यांचे सत्र सुरूच
By Admin | Updated: July 9, 2014 00:34 IST2014-07-08T22:56:16+5:302014-07-09T00:34:37+5:30
जाफराबाद : जाफराबाद बस स्थानकासमोर व पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली एक पान टपरी मध्ये फोडण्यात आली.

जाफराबादेत चोऱ्यांचे सत्र सुरूच
जाफराबाद : जाफराबाद बस स्थानकासमोर व पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेली एक पान टपरी मध्ये फोडण्यात आली. यात रोख रक्केसह ३० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून, या प्रकरणी पोलिस गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आजूबाजूला कोणीही नसल्याचा फायदा घेऊन टपरीमधील रोख रक्कम सहा हजार रूपये आणि तंबाखू जन्य पदार्थ, सिगारेट, बिड्या व इतर साहित्य चोरी झाल्याची फिर्याद सय्यद अतिक रा.जाफराबाद यांनी पोलिसात दिली आहे.
यापूर्वी परिसरात विद्यार्थी सायकल, नळावरील विद्युत पंप, या सह अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांना चोरट्यांना पकडण्यात अपयश येत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)