माजी सैनिकांसाठी जाफराबादेत कॉल सेंटर
By Admin | Updated: April 10, 2015 00:24 IST2015-04-10T00:08:05+5:302015-04-10T00:24:54+5:30
जाफराबाद : सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर माजी सैनिक व शहीद कुटुंबियांना माहितीअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून

माजी सैनिकांसाठी जाफराबादेत कॉल सेंटर
जाफराबाद : सैन्यामधून सेवानिवृत्त झाल्यानंतर माजी सैनिक व शहीद कुटुंबियांना माहितीअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य मार्गदर्शन मिळत नाही म्हणून येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन समस्या सोडविण्यासाठी जाफराबाद येथे माजी सैनिकांकरिता हॉटलाईन म्हणून कॉल सेंटर सुरू करणार असल्याचे माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष कुंडलिकराव मुठ्ठे यांनी सांगितले. इंडियन एक्स सर्व्हीस लिग यांच्या वतीने तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस स्वातंत्र्य लढ्यातील शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन मेळाव्याचे उद्घाटन पेन्शन विभागाचे सहायक सेक्रेटरी एम.जी. बिलेवाड यांनी दीपप्रज्वलन करून केले. माजी सैनिकांच्या सोबत संवाद साधून माजी सैनिकांसाठी असलेले शासन निर्णय, पेन्शन प्रकरणातील उणिवा, माहितीचा अभाव, प्रस्ताव दाखल करताना घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जाफराबाद तालुक्यात २४७ माजी सैनिक व ६७ महिला या शहीद व वृद्धापकाळाने विधवा आहे. त्यांच्या कुटुंबाला वेळोवेळी सहकार्य व्हावे, म्हणून या कॉलसेंटरची गरज भासणार आहे. कॉल सेंटरसाठी लागणाऱ्या जागेची व्यवस्था संघटनेने केली आहे. यावेळी भगवान खरात, एम.के. सरोदे, श्रीकांत काकडे, भुजंगराव गवळी, शिवाजी भालके, रघुनाथ लोखंडे, उत्तमराव सरडे, आश्रुबा जाधव, सखाराम नवले, सिद्धार्थ पालवे, गणेश सरडे, सुनीता मोरे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)