जाफराबाद तालुक्याला मिळणार लाल दिवा !

By Admin | Updated: September 19, 2014 00:59 IST2014-09-19T00:42:44+5:302014-09-19T00:59:27+5:30

प्रकाश मिरगे , जाफराबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होत असून अध्यक्षपदाची माळ जाफराबाद तालुक्यातील जि.प. सदस्याच्या गळ्यात पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

Jafarabad taluka will get red light! | जाफराबाद तालुक्याला मिळणार लाल दिवा !

जाफराबाद तालुक्याला मिळणार लाल दिवा !


प्रकाश मिरगे , जाफराबाद
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबर रोजी होत असून अध्यक्षपदाची माळ जाफराबाद तालुक्यातील जि.प. सदस्याच्या गळ्यात पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये भाजपा-शिवसेना युतीचे ३० व ४ अपक्ष असे बहुमत आहे. यावेळी अध्यक्षपद भाजपाला मिळणार, हे जवळपास निश्चित असून या पक्षाचे सर्व सदस्य सहलीवर गेलेले आहेत.
जाफराबाद तालुक्यात भाजपाचे तीन सदस्य असून हा तालुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये युतीच्या पाठिशी भक्कमपणे राहिलेला आहे. गेल्या पंधरा वर्षांचा हा इतिहास आहे.
मात्र तालुक्याला अद्याप अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला नाही. यावेळचे अध्यक्षपद सर्वसाधारण पदासाठी आरक्षित आहे. त्यामुळे कुंभारझरी गटातून निवडून आलेल्या सविता गणेश म्हस्के यांनी प्रबळपणे दावा केल्याची माहिती हाती आली आहे.
तालुक्याला आतापर्यंत शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण, समाजकल्याण या विभागांची सभापती पदे देऊन खूश करण्यात आले. शिवाय जाफराबाद-भोकरदन विधानसभा मतदारसंघ एक असल्याने अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आजपर्यंत कमी होती. म्हस्के यांच्यासह लिलाबाई लोखंडे, शीतल गव्हाड यांनी देखील अध्यक्षपदावर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नावाचा विचार करण्यात येणार अशीही शक्यता आहे.
लिलाबाई लोखंडे या माजी तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे यांच्या मातोश्री आहेत. दोघेही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे खंदे समर्थक असून दानवे यांच्याच सुचनेचे ते पालन करणार आहेत.
४जाफराबादसह भोकरदन तालुक्यातील इच्छुकांची संख्याही मोठी आहे. यामध्ये विद्यमान सभापती वर्षा देशमुख, शीला गणेश फुके, लिलाबाई साबळे, रामेश्वर सोनवणे, भगवान तोडावत यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु जाफराबादला सभापती पदाशिवाय काही मिळाले नाही. म्हणून यावेळी अध्यक्षपद निश्चित मिळणार, असा विश्वास आहे.
४सभापती शीतल गव्हाड या माजी सभापती रमेश गव्हाड यांच्या सूनबाई आहेत. मात्र त्यांचे लक्ष विधानसभेसाठी केंद्रीत झाल्याने जाफराबादला संधी मिळणार, एवढे मात्र निश्चित.

Web Title: Jafarabad taluka will get red light!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.