गृहरक्षक दलाच्या जवानांवर मोलमजुरी करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:02 AM2021-05-19T04:02:06+5:302021-05-19T04:02:06+5:30

पुनर्नियुक्तीअंतर्गत गृहरक्षक दलाच्या जवानांना दर तीन वर्षांनी आपल्या व्यवसायाचे नूतनीकरण करण्याची अट आहे. त्यामध्ये त्यांना शारीरिक प्रशिक्षणाला सामोरे जावे ...

It's time to dump her and move on | गृहरक्षक दलाच्या जवानांवर मोलमजुरी करण्याची वेळ

गृहरक्षक दलाच्या जवानांवर मोलमजुरी करण्याची वेळ

googlenewsNext

पुनर्नियुक्तीअंतर्गत गृहरक्षक दलाच्या जवानांना दर तीन वर्षांनी आपल्या व्यवसायाचे नूतनीकरण करण्याची अट आहे. त्यामध्ये त्यांना शारीरिक प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. पोलिसांप्रमाणेच गृहरक्षक दलाच्या जवानांच्या कर्तव्याचे स्वरूप असताना, त्यांना केवळ गरजेप्रमाणे व सोयीप्रमाणे न बोलविता वर्षातून किमान सहा महिने अखंडितपणे त्यांना सेवेत सामावून घेतल्यास ते आपले काम अधिक चोखपणे बजावू शकतात. सध्याच्या कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. सध्या गृहरक्षक दलाच्या जवानांना अत्यंत गरज असताना कोरोनाच्या संकटात तरी त्यांना कामावरून घरी पाठवू नये. अतिशय तुटपुंज्या मानधनावर गृहरक्षक दलाचे जवान इमानेइतबारे कर्तव्य बजावत असताना, त्यांना त्यांचे प्रतिदिन मानधन वेळेवर दिल्यास कुटुंबाची उपजीविका करणे शक्य होईल. जिल्हा समादेशकांनी ही बाब सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने घ्यावी, अशी भावना गृहरक्षक दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे.

Web Title: It's time to dump her and move on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.