शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

ऐकावे ते नवलच ! उंदरांच्या शिकारीसाठी मांजरांचे अपहरण, दोघे रंगेहाथ ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 17:23 IST

Take Care Of Your Cats : मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात मांजरीचे अपहरण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

औरंगाबाद : रोपेवाटिका, नर्सरीत हैदोस घालणाऱ्या उंदरांची शिकार करण्यासाठी मांजराचे अपहरण (kidnapping of cats for rat hunting) केल्याचा प्रकार मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगरमध्ये उघडकीस आला आहे. नागरिकांनी मांजरे पकडणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले. या दोघांच्या विरोधात प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Take Care Of Your Cats )

मुकुंदवाडी परिसरात मांजरींना मटणाचे तुकडे टाकून गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. मटणाच्या आशेने आलेले मांजर गळाने पकडून पिशवीत टाकण्यात येत होते. दुचाकीवरून (टीएस ०७ एचएस ६२९८) दोघे परिसरात फिरत होते तेव्हा अमोल चव्हाण यांनी मांजरी पकडत असल्याची माहिती प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी संघटनेचे सदस्य श्रीनिवास नंदलाल धुप्पड यांना दिली. धुप्पड यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळांतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दुचाकीवरून मांजरी शोधत असलेल्या दोघांना चव्हाण व धुप्पड यांनी गाठले. विचारपूस करताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने पकडले. त्या दोघांचे करुणाकर शामसन गंटा (१९) आणि लोकेश शिवय्या कटा (१९, दोघे रा. मूळ गाव शंकरपल्ली, जि. रंगारेड्डी, तेलंगणा, ह.मु. इंदेवाडी झोपडपट्टी, जालना) अशी नावे आहेत. या दोघांना नागरिकांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पकडून आणले. त्याठिकाणी धुप्पड यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोघांच्या ताब्यातील मांजर जप्त करत सोडून देण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करत आहेत.

मांजरांची नर्सरीमध्ये विक्रीपकडलेल्या मांजरी विविध नर्सरींमध्ये विक्री करण्यात येत असल्याची माहिती अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे. या मांजरी नर्सरीतील उंदारांची शिकार करतात. त्यामुळे त्यांना नर्सरीचे मालक चांगली किंमत देतात. पकडलेले दोन्ही आरोपी केस गोळा करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्याच्या जोडीला हा व्यवसाय करत असल्याचेही चौकशी समोर आले आहे.

वनविभागाने केले हात वरमुकुंदवाडी पोलिसांनी मांजर पकडून घेऊन जात असल्याच्या प्रकाराची माहिती पत्राद्वारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाळीव प्राण्याच्या संदर्भात आम्ही कोणतीही कारवाई करत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनीच पकडलेल्या दोन युवकांवर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचारCrime Newsगुन्हेगारी