आचारसंहिता पथकाच्या भीतीने पैशाची ने-आण अवघड

By Admin | Updated: September 30, 2014 01:26 IST2014-09-30T00:08:19+5:302014-09-30T01:26:53+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात उजनी, चाकूर, किल्लारी, पळशी, मुरूड, उदगीर, कासारसिरसी आदी ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वाहन तपासणीत आचारसंहिता पथकाने

It's difficult to get money and fear of the code of conduct | आचारसंहिता पथकाच्या भीतीने पैशाची ने-आण अवघड

आचारसंहिता पथकाच्या भीतीने पैशाची ने-आण अवघड


लातूर : लातूर जिल्ह्यात उजनी, चाकूर, किल्लारी, पळशी, मुरूड, उदगीर, कासारसिरसी आदी ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वाहन तपासणीत आचारसंहिता पथकाने २९ सप्टेंबरपर्यंत ९ वाहनांसह २४ लाख रूपये पकडले आहेत.
२८ सप्टेंबर रोजी लातूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या (एम़एच १० बी़एम़०८९१) कारची उजनी मोड येथे तपासणी एस़एस़टीच्या पथकाने केली असता, संग्राम कांबळे (रा़देवणी) हा त्यांच्या कुटुंबियासह जत या त्यांच्या नोकरीच्या गावी जात असताना त्यांच्या कारमध्ये आठ लाख रूपये आढळून आले़ याबाबत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियाकडे चौकशी केली असता, सासऱ्याकडून प्लॉटसाठी पैसे आणल्याचे त्यांनी सांगितले, तर त्यांच्या सासऱ्याशी फोनवर संपर्क केला असता त्या पैशाबाबत दिशाभूल करणारी माहिती समोर आली़ त्यामुळे पथकातील लोकांचा संशय वाढला असता सदरील पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलविले व त्यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा केला़ भादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी सर्व मुद्देमाल शनिवारी उशिरा जप्त केला़
चाकूर पोलिसांचे एस़एस़टी पथकातर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनाची तपासणी करण्यात येत आहे़ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अहमदपूरकडून लातूरकडे जाणारी एम़एच़२४ व्ही़ ४४७१ या कारची तपासणी एस़एस़टी़ पथकाचे एम़एम़सूर्यवंशी, प्रल्हाद भालके, राजगिरवाड, मुंडे यांनी केली असता या कारमधील १ लाख ११ हजार ७०० रूपये रक्कम आढळून आली़
या पथकाने कारसह चालक सुनिल गिरी व त्यांच्या सोबतचे गौस अली अहमद तांबोळी, इस्माईल रफीसाब तांबोळी (रा़अहमदपूर) यांना कार व रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)

Web Title: It's difficult to get money and fear of the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.