शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'जीव गेला तरी चालेल; परंतु नियम मोडणारच'; वाहनधारकांचे पोलिसांशी भांडणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 19:24 IST

ई- चलन आले तरीही वाहन धारक सुसाट

ठळक मुद्देनागरिकांनी मानसिकता बदलावी कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारच

औरंगाबाद :  वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून हुज्जत घालून कामात अडथळा निर्माण केला जातो. अनेकदा धक्काबुक्कीचे प्रसंग ओढावल्याच्या प्रकारात घट होण्याऐवजी त्यात वाढच होत आहे. 

मोबाईल किंवा व्हॉटस्अ‍ॅपवर दुचाकीस्वाराचा फोटो काढून तो आॅनलाईन पावतीसाठी टाकणे हा योग्य पर्याय आहे. रोख व्यवहारात पोलीस कर्मचारी अपहार करतात, असा नागरिकांतही गैरसमज झाला आहे. त्यामुळे ई-चालान दंड भरणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास तुम्हाला पोलीस हटकणार नाही, असे वाहतूक शाखेच्या पोलिसांचे म्हणणे आहे. नियम मोडणार आणि पोलिसांना पाहून न पाहिल्यागत करीत सुसाट वाहनावरून पळून जाणे हे नियमाविरुद्ध आहे. जीवन मौल्यवान आहे, धावत्या वाहनावर फोन वापरू नका, वाहतूक नियमांचे पालन करा, रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्या, असे समुपदेशन अनेकदा केले आहे. नियम मोडणाऱ्यांना पोलीस चौकीत किंवा ठाण्यात दिवसभर बसवून त्यांना किरकोळ दंड लावून सोडून दिल्याचे प्रकारही घडले आहेत; परंतु वाहतुकीचे नियम मोडण्यात अद्याप कुणी माघार घेतलेली नाही, तर फ्री स्टाईल हाणामारीपर्यंत अनेकदा प्रकरणे गेली आहेत. 

५ मे रोजी जळगाव रोडवर दुचाकीस्वार युवकाने नियम मोडला. त्याने आॅनलाईन चालान पाठविण्याची मागणी केली. चावी काढू नका मला अर्जंट काम आहे, असा आग्रह धरला, त्यासही पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली. वाहन चालविताना फोनवर बोलणाऱ्याला हटकले म्हणून वाहन चालविणाऱ्या दोघांनी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून ई-चालान मशीन हिसकावण्याचा प्रकार घडला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास गुलमंडीत घडली. वाहन पार्किंगच्या विषयावरून मारहाणीचा प्रकार गत दोन महिन्यांपूर्वी आमदार कार्यालयासमोर पुंडलिकनगर परिसरात घडला होता. सिल्लेखाना येथेही मारहाणीचा प्रकार घडला होता. ई-चालान द्या भांडणे होणार नाहीत, असा आग्रह जनसामान्यातून होत असून, वाहन अडवून त्याची चावी काढून घेणे, हा प्रकार वाहतूक कर्मचाऱ्यांनी टाळायला हवा. आॅनलाईन दंड, ई-चालानचा वापर करा,असे  त्रस्त वाहनचालकांचे म्हणणे आहे. 

कायदा तोडला तर गुन्हे दाखल होणारचवाहतूक शाखेचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त भारत काकडे म्हणाले की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. चूक केल्यास गुन्हे दाखल होणारच. अपघात होऊ नये म्हणून नागरिकांनीच मानसिकता बदलावी. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघातAurangabadऔरंगाबाद