इसापूर प्रकल्पातून नऊ पाणीपाळ््या मिळणार
By Admin | Updated: December 11, 2014 00:27 IST2014-12-11T00:25:34+5:302014-12-11T00:27:53+5:30
नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार

इसापूर प्रकल्पातून नऊ पाणीपाळ््या मिळणार
नांदेड : रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी मिळणार की नाही, ही संभ्रमावस्था असताना उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना रबीसाठी चार तर उन्हाळी हंगामासाठी पाच पाणीपाळ््या देण्यात येणार असल्यामुळे रबी, उन्हाळी हंगाम घेवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
इसापूर प्रकल्पात रबी हंगाम २०१४-१५ च्या प्रारंभी १५ आॅक्टोबर २०१४ रोजी ७५८.१७ दलघमी म्हणजे ७८.६४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार रबी हंगाम व उन्हाळी हंगामासाठी एकूण नऊ पाणीपाळ््या देण्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार रबी हंगामातील पिकांना पाणी मिळणार आहे. इसापूर प्रकल्पात सध्या ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाणी आरक्षीत करुन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना रबी व उन्हाळी हंगामासाठी सिंचन विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. यामुळे खरिपात बुडालेल्या शेतकऱ्यांना रबीने तरी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा वाटत आहे. यासंदर्भात नियोजन केले आहे. इसापूर धरणातून मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील गहू, ज्वारी, हरभरा, सूर्यफूल, केळी, हळद, ऊस, कापूस, तूर आदी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. रबी हंगामातील चार रोटेशनपैकी २६ आॅक्टोबर २०१४ व २६ नोव्हेंबर २०१४ अशा दोन पाणीपाळ््या देण्यात आल्या आहेत.
तर उर्वरित २६ डिसेंबर २०१४ व २६ जानेवारी २०१५ अशा आणखी दोन पाणीपाळ््या सोडण्यात येणार आहेत. यामुळे सिंचनाखाली असलेल्या भागातील बळीराजाला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
यानंतर उन्हाळी हंगामाचेही संभाव्य नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन उन्हाळी हंगामासाठी १ मार्च ते ३० जून यादरम्यान पाच पाणीपाळ््या देण्यात येणार आहेत. उन्हाळी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. या निर्णयामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल़ (प्रतिनिधी)