अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी चालकांवर आली गिरण्या बंद करण्याची वेळ
By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:52+5:302020-11-29T04:06:52+5:30
महावितरणने या गावात चार रोहित्र बसवले आहेत. गावातील मुख्य बाजारपेठेसाठी तीन रोहित्रे आहेत. मात्र, गत दीड महिन्यांपासून तेथील एक ...

अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी चालकांवर आली गिरण्या बंद करण्याची वेळ
महावितरणने या गावात चार रोहित्र बसवले आहेत. गावातील मुख्य बाजारपेठेसाठी तीन रोहित्रे आहेत. मात्र, गत दीड महिन्यांपासून तेथील एक रोहित्र नादुरुस्त आहे. याविषयी अनेकवेळा महावितरणला कळवण्यात आले; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या रोहित्रावर तीन गिरण्या आणि शासकीय कार्यालय अवलंबून आहे. रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे येथील गिरणीमालकांवर गिरण्या बंद करण्याची वेळ आली आहे.
तरीही लाईट बिल
रोहित्र नादुरुस्त असल्यामुळे गत दीड महिन्यांपासून या भागातील गिरण्या बंद आहेत. त्यामुळे गिरणीचालकही उत्पन्नापासून वंचित झाले आहे. रोहित्र बंद असल्यामुळे लाईटही दीड महिन्यापासून नाहीत. तरीदेखील महावितरणतर्फे गिरणीचालकांना लाईट बिल देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्पन्नच नाही व लाईट नसल्यामुळे बिल कसे भरावे हा प्रश्न आहे. त्यामुळे गिरणी बंद करण्याची वेळ माझ्यावर आली असल्याचे गिरणीचालक शेख ईसा शेख बशीर यांनी सांगितले.