शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

मुलानेच दिली होती वडिलांची सुपारी; आई-भावडांना वाऱ्यावर सोडून तीन लग्न केल्याचा राग

By सुमित डोळे | Updated: August 3, 2023 19:53 IST

हनुमान नगरात घरात घुसून गोळीबार प्रकरणाचा उलगडा

छत्रपती संभाजीनगर : लहाणपणी वडिलांनी आई आणि भावडांना सोडून देत नंतर तीन संसार बसवले. त्यानंतर ना खर्चासाठी पैसे दिले ना कधी संपर्क केला. मनपातून सेवानिवृत्त झाल्यानंतरही मिळालेल्या आर्थिक लाभातून कुठलीही मदत केली नाही. वडिलांच्या या रागातूनच हनुमान नगरमध्ये प्रभू आनंद अहिरे (६१) यांच्यावर त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाने गोळीबार करवला. 

गुन्हेगारांना दिड लाखांची सुपारी ठरवून ५५ हजार आगाऊ रक्कम देत त्याने हा प्रकार केला. महादु आहिरे (३२, रा. कन्नड) असे त्याचे नाव असून सचिन भास्कर अंभोरे (२४, ता. कन्नड) व नंदकिशोर परसराम अंभोरे-देशमुख (२६, रा. चिखली, बुलढाणा) असे सुपारी घेतलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे. पोलिसांचे पाच पथकांनी सलग तीन दिवस तपास करुन या घटनेचा उलगडा केला.

अहिरे यांच्यावर ३१ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता अज्ञातांनी घरात घुसून गोळीबार केला. यात ते थोडक्यात बचावले. मनपात सफाई कामगार राहिलेल्या अहिरे यांच्यावर भरदिवसा गोळीबार करुन कोणी का मारेल, असा प्रश्न पोलिसांसमोर पडला. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासासाठी सुचना केल्या. अहिरे यांच्यासह त्यांच्यापुर्वी त्या घरात भाडेतत्वावर राहणाऱ्या तीन कुटूंबाची चौकशी सुरू झाली. दुसरीकडे सातत्याने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास, जबाब सुरू होते. मंगळवारी अहिरे याच्याच चौकशीत त्याच्या तीन पत्नी, दहा पेक्षा अधिक मुलांविषयी माहिती मिळाली. 

पहिल्या पत्नीचा संपर्कही नसल्याचे समोर आल्यावर पोलिसांचा तपास त्या दिशेने फिरला. बुधवारी त्यांनी महादुला ताब्यात घेतले आणि सर्व घटनेचा उलगडा झाला. उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी रणजित पाटील, धनंजय पाटील, निरीक्षक कैलास देशमाने, राजश्री आडे, एपीआय सुधिर वाघ, मनोज शिंदे, काशिनाथ महांडुळे, अमोल म्हस्के, प्रविण वाघ, पुंडलिकनगरचे एपीआय शेषराव खटाणे, विठ्ठल घोडके, संदिप काळे, दिपक देशमुख, जालिंधर मांटे, संतोष पारधे, गणेश डाेईफोडे, कल्याण निकम, अजय कांबळे, संदिप बीडकर, दिपक जाधव यांनी कारवाई पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद